स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून कल्याणला सात लाखांची रोख रक्कम जप्त
By सुरेश लोखंडे | Updated: May 16, 2024 15:36 IST2024-05-16T15:35:48+5:302024-05-16T15:36:00+5:30
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्व्हेक्षण पथकाने (एसएसटी) सात लाख रूपयांची संशयास्पद रोख रक्कम जप्त केल्यामुळे खळबळ उघडली आहे.

स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून कल्याणला सात लाखांची रोख रक्कम जप्त
ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्व्हेक्षण पथकाने (एसएसटी) सात लाख रूपयांची संशयास्पद रोख रक्कम जप्त केल्यामुळे खळबळ उघडली आहे. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यास अनुसरून या एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी पुलावरील टिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे राहणार पुणा लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व)) यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा पथकाने केली.
त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, या रोख रक्कमेबाबत संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे ही रक्कम रुपये सात लाख रूपयांचा पंचनामा करून जप्त करण्यात आली. जप्त केलेली ही रक्कम कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सीलबंद करून जमा करण्यात आले असल्याची माहिती कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पथकप्रमुख दिपेश राठोड यांनी दिली आहे.