उल्हासनगर महापालिका शाळेतील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 17:24 IST2025-03-03T17:22:03+5:302025-03-03T17:24:58+5:30
Ulhasnagar News: महापालिका शाळा प्रांगणातील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टीची तक्रार महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केल्यानंतर, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली असून आरोपी गजाआड होण्याचे संकेत दिले.

उल्हासनगर महापालिका शाळेतील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका शाळा प्रांगणातील हिरकणी कक्षातील ओल्या पार्टीची तक्रार महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केल्यानंतर, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. असी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली असून आरोपी गजाआड होण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन चौक परिसरात महापालिका शाळा क्रं-२९ व ८ असून शाळेत शेकडो मुले शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. शाळेच्या आवारात ऐक नव्हेतर तीन हिरकणी कक्ष बनसविण्यात आले असून एका कक्षात ओली पार्टीचा भांडाफोड झाल्यावर खळबळ उडाली. याप्रकाराची दखल आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी घेतल्यावर, महापालिकेकडून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी दोन दिवसानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली आहे.
लपवा छपवी
महापालिका शाळा आवारातील तीन पैकी दोन हिरकणी कक्ष लॉकबंद असून ज्या हिरकणी कक्षात ओली पार्टी झाल्याचे उघड झाले, त्या कक्षाचे दरवाजे तुटलेल्या स्थितीत आहेत. ओल्या दारू पार्टीनंतर महापालिकेने शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे दुरस्त करून २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. तसेच हिरकणी कक्षाला सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते कॅमेरे तपासले असतेतर, ओल्या दारू पार्टीचे खरे आरोपी उघड झाले असते. असी चर्चा रंगली आहे. यामध्ये आरोपीची लपवाछपवी सुरु आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला.
यापूर्वी शाळेत शिलाई मशीनचा साठा
लोकसभा निवडणूक वेळी याच शाळेत विनापरवाना शिलाई मशीन व घंटागाडीचा साठा ठेवून महिलांना अवैधपणे वाटप केला होता. याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे.