विवाहितेला विषारी औषध देऊन जबरदस्ती गर्भपात केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: September 7, 2023 17:48 IST2023-09-07T17:48:09+5:302023-09-07T17:48:13+5:30
विवाह नंतर ८ मे २०२१ पासून ते १६ ऑक्टोबर २०२१ यादरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी दिपाली चा वेळोवेळी छळ करून तिचा गैर कायदेशीररित्या गर्भपात केला

विवाहितेला विषारी औषध देऊन जबरदस्ती गर्भपात केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
भिवंडी: विवाहितेचा छळ करून गर्भपात करत या विवाहितेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विषारी औषध दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपाली सागर पाटील वय २१ वर्ष असे पीडित महिलेचे नाव असून सदर महिला मलकापूर बुलढाणा येथील असून तिचा विवाह कामतघर येथे राहणाऱ्या सागर प्रकाश पाटील याच्यासोबत दोन वर्षणपूर्वी झाला होता. विवाह नंतर ८ मे २०२१ पासून ते १६ ऑक्टोबर २०२१ यादरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी दिपाली चा वेळोवेळी छळ करून तिचा गैर कायदेशीररित्या गर्भपात केला व तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विषारी औषध दिले होते.
या प्रकरणी दिपाली हिने बुलढाणा मलकापूर येथे पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा तपासासाठी नारपोली पोलिसांकडे आला असून बुधवारी आशा उर्फ योगिता योगेश पाटील, गोपाल प्रकाश पाटील, मंगलबाई प्रकाश पाटील, प्रकाश तुळशीराम पाटील व सागर प्रकाश पाटील अशा पाच जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.