उच्चभ्रू वस्तीतच सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक, गुन्हे शाखेची कारवाई; पिडित तरुणीची सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: February 13, 2025 22:25 IST2025-02-13T22:25:02+5:302025-02-13T22:25:27+5:30
या प्रकरणी वर्तकनगर पाेलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

उच्चभ्रू वस्तीतच सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक, गुन्हे शाखेची कारवाई; पिडित तरुणीची सुटका
ठाणे : एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक चेतना चाैधरी यांनी गुरुवारी दिली. त्याच्या तावडीतून एका पिडित तरुणीची सुटकाही करण्यात आली आहे.
ठाण्यातील यशाेधननगर भागात काही असहाय महिलांना फूस लावून देहविक्रीच्या व्यवसायात अडकविले जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पाेलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात चाैधरी यांच्यासह जमादार दीपक वालगुडे, दीपक भाेसले आणि हवालदार किशाेर पाटील आदींच्या पथकाने १२ फेब्रुवारी २०२५ राेजी यशाेधन नगर भागातील एका इमारतीत छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका पीडित तरुणीची या दलालाच्या तावडीतून त्यांनी सुटकाही केली.
या प्रकरणी वर्तकनगर पाेलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.