रायगड जिल्ह्यात निवारा शेडवर टेम्पो पडून वीटभट्टी कामगार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2023 06:38 IST2023-03-04T06:37:51+5:302023-03-04T06:38:07+5:30
खालापूर तालुक्यातील घटना; पत्नी व मुलाची मृत्यूशी झुंज

रायगड जिल्ह्यात निवारा शेडवर टेम्पो पडून वीटभट्टी कामगार जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : दिवसभर वीटभट्टीवर अंगमेहनत करून रस्त्यालगत असलेल्या निवारा शेडवर झोपलेल्या कुटुंबावर पहाटेच्या वेळी टेम्पो पलटी झाल्याने एक कामगार जागीच ठार झाला तर त्याची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खालापूर तालुक्यात पौद-कलोते मार्गावर हा अपघात घडला. यात संजय अनंत जाधव (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी दीपाली (वय ३०) व मुलगा संकेत यांचे दोन्ही पाय निकामी झाले असल्याचे समजते. पौद-कलोते मार्गावर टेम्पो हा ऑइल भरलेले बॅरल घेऊन पहाटे डोंबिवलीकडे जात होता. वीटभट्टी कामगारांसाठी निवारा शेड असून, हे कुटुंब यात झाेपलेले होते. या शेडवर टेम्पो पलटी झाला. चालक सिंवा अशोक यादव (डोंबिवली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.