भिवंडी- दारू पाजली नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात आपटली वीट
By नितीन पंडित | Updated: April 15, 2023 17:57 IST2023-04-15T17:56:59+5:302023-04-15T17:57:25+5:30
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी- दारू पाजली नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात आपटली वीट
भिवंडी- मित्रासह चायनीज सेंटरवर जेवणासाठी गेलेल्या तरुणाला दारू पाजण्यास सांगितल्याने दारू पाजण्यास नकार दिल्याने नकार देणाऱ्या तरुणाच्या डोक्यात वीट आपटून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देविदास तुळशीराम कोठवळ वय 35 वर्ष राहणार गायत्री नगर भिवंडी असे जखमी तरुणाचे नाव आहे. देविदास हा आपला मित्र शिवदास शिंदे यांच्यासोबत नागाव येथे एका चायनीज सेंटरवर जेवणासाठी गेला होता. यावेळी या ठिकाणी एका १९ वर्षीय दुधाळे नावाच्या तरुणाने देविदास यास दारू पाजण्यास सांगितली. त्यास देविदास याने नकार दिल्याने त्याचा राग दुधाळे यास आल्याने दुधाळे याने देविदास च्या डोक्यात वीट आपटून देविदास ला जखमी केले. याप्रकरणी देविदास च्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात दुधाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.