- धीरज परबमिरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होत असताना रिकामी आधार कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही वर्षां पूर्वी विधानसभा निवडणुक वेळी शेकडो बोगस आधार कार्ड भाईंदरच्या राई खाडीत टाकलेली सापडली होती. त्यामुळे यंदाच्या मतदार यादी घोटाळा माध्यमातून मोठ्या प्रमाणात बोगस मतदान ची तयारी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मीरारोड, काशिमीरा च्या नीलकमल नाका जवळील मानसी इमारत बाहेर रविवारी रिकामी आधारकार्ड मोठ्या संख्येने फेकलेली आढळून आली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच काही आणि एका पक्षाच्या लोकांना याची माहिती मिळताच घटना स्थळ वरून कोऱ्या आधारकार्डचा गठ्ठाच गायब करण्यात आला असे काँग्रेसचे पदाधिकारी दीपक बागरी यांनी सांगितले. या प्रकरणी काशिगाव पोलीस आणि निवडणूक पथकास कळवले असता त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही असा आरोप बागरी यांनी केला आहे. काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले की आचार संहिता पथकाने पाहणी केली असून त्यांनी फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करून घेतला जाईल.
ह्या आधी काही वर्ष पूर्वी विधानसभा निवडणुकीत राई गाव येथील खाडीत शेकडो बोगस पॅनकार्ड सह भाईंदर पश्चिम भागातील कोणत्या मतदारच्या नावाने कोणी मतदान करायचे अशी कागदे सापडली होती. मात्र त्यावेळी देखील पोलिस आणि आचार संहिता पथकाने गुन्हा दाखल करून चौकशी केली नव्हती. त्यामुळे यंदाच्या मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत मतदार यादीतील घोटाळा करून मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप दीपक बागरी यांनी केला आहे.
Web Summary : Unfilled Aadhaar cards found near Mira Bhayandar before elections raise concerns. Congress alleges voter list irregularities and inaction by authorities. Similar incidents occurred previously, fueling fears of fraudulent voting. Police will file a case upon complaint from the code of conduct team.
Web Summary : मीरा भायंदर चुनाव से पहले खाली आधार कार्ड मिलने से चिंता बढ़ी। कांग्रेस ने मतदाता सूची में अनियमितताओं और अधिकारियों द्वारा कार्रवाई न करने का आरोप लगाया। पहले भी ऐसी घटनाएं हो चुकी हैं, जिससे धोखाधड़ी से मतदान का डर बढ़ गया है। आचार संहिता दल की शिकायत पर पुलिस मामला दर्ज करेगी।