इमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By धीरज परब | Updated: July 13, 2023 18:52 IST2023-07-13T18:52:26+5:302023-07-13T18:52:38+5:30
इमारतीच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली.

इमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मीरारोड - इमारतीच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर पारिजात ही चार मजली इमारत आहे. इमारतीत राहणारा १३ वर्षांचा जतीन परमार हा मुलगा गच्चीवर खेळण्यासाठी गेला होता. कठड्यावर बसला असताना तोल जाऊन खाली पडला.
गंभीर जखमी झालेल्या जतीन याला रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. बुधवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असे राहिवाश्यांनी सांगितले. नवघर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.