शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

ठाणे आयुक्तालयातील ९३ टक्के पोलिसांनी घेतली लस, ५२ टक्के जणांना दुसरा डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 02:54 IST

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह ६४४ अधिकारी आणि सात हजार ८४८ कर्मचारी अशा आठ हजार ४९२ पोलिसांनी म्हणजे एकूण पोलीस दलापैकी ९३ टक्के पोलिसांनी कोरोनावरील लस घेतली आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे : पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह ६४४ अधिकारी आणि सात हजार ८४८ कर्मचारी अशा आठ हजार ४९२ पोलिसांनी म्हणजे एकूण पोलीस दलापैकी ९३ टक्के पोलिसांनी कोरोनावरील लस घेतली आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात ठाणे शहर पोलिसांनी कठोर परिश्रम घेत बंदोबस्त केला. या काळात कर्तव्यावरील २३८ अधिकारी आणि एक हजार ७८८ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. यात ३५ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आठ हजार ४७६ इतकी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या असून त्यातील सात हजार ८४८ पोलिसांनी कोरोनावरील पहिला डोस घेतला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेखला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संजय येनपुरे, विशेष शाखेचे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि मुख्यालयाचे उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह आयुक्तालयातील ६४४ अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.पूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतांना पोलिसांमधील बाधितांची संख्याही वाढत होती. तेंव्हा २०० कर्मचारी रुग्णालयात दाखल असतांना २५ अतिदक्षता विभागात होते. आता लसीकरणामुळे ३४ बाधित असून त्यातील केवळ २५ पोलिसांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराचा हा परिणाम असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. चार हजार ६३२ पोलिसांनी घेतला दुसरा डोस ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांसह मुख्यालयातील आठ हजार ४९२ पोलिसांनी पहिला डोस घेतला आहे. त्यातील ३४६ अधिकारी आणि चार हजार २८६ कर्मचारी अशा चार हजार ६३२ पोलिसांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतला. हे प्रमाण एकूण पोलिसांच्या ५१ टक्के आहे. ९० टक्के महिला पोलिसांनी घेतली लसठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मुख्यालयासह २०५ महिला अधिकारी असून त्यातील १७५ अधिकारी महिलांनी लस घेतली आहे. तर दोन हजार ५४३ महिला अंमलदार असून त्यातील दोन हजार २८० महिलांनी कोरोनावरील लस घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ९० पेक्षा अधिक म्हणजे ४८ टक्के महिला पोलिसांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. चार महिन्यांपूर्वीच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कोरोनावरील लसीची नोंदणी झाली होती. फ्रंटलाइन वर्करला लसीकरण सुरू झाल्यानंतर पोलीस आयुक्तांसह सुमारे ९३ टक्के पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ५१ टक्के पोलिसांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्हा रुग्णालय आणि पालिकेच्या रुग्णालयात जाऊन पोलिसांनी हे लसीकरण केले. ’’- प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणेPoliceपोलिस