9 girls born in hospital; Rare coincidence happened on the day of the engagement | रूग्णालयात तब्बल 9 मुलींचा जन्म; घटस्थापनेच्या दिवशी घडला दुर्मीळ योगायोग

रूग्णालयात तब्बल 9 मुलींचा जन्म; घटस्थापनेच्या दिवशी घडला दुर्मीळ योगायोग

कल्याण : येथील पश्चिमेकडील सिंडीकेट परिसरातील वैष्णवी या  रूग्णालयात शनिवारी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची घटना घडली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मीळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र चर्चा सुरू आहे. जणू काही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. 

या रूग्णालयात शनिवारी 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. यापैकी 9 महिलांनी मुलींना जन्म तर अन्य दोन महिलांनी मुलांना जन्म दिल्याची माहीती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. आमच्या रूग्णालयात एकाच दिवशी 11 प्रसूती होणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र एकाच दिवशी आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणे, ही नक्कीच वेगळी आणि आनंदाची बाब असल्याचे कककर म्हणाले. या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या मातांची तब्येत ठणठणीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 9 girls born in hospital; Rare coincidence happened on the day of the engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.