शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पालघरच्या जव्हार-मोखाड्यात आढळली ८७३ कुपोषित बालके; आराेग्य विभागाचा दावा फाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 08:05 IST

अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका

जव्हार : आरोग्यसेवेवर कोट्यवधी खर्च, कुपोषणावर मात करण्यासाठी विविध योजना, दरवर्षी कागदावर नेमला जाणारा टास्क फोर्स अशा एकना अनेक घोषणा करूनही कुपोषणमुक्त पालघर जिल्हा करण्याचा दावा फोल ठरला आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यात गेल्या महिन्यात अतितीव्र ७०, तर तीव्र ८०३ कुपोषित बालके आढळली आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर असल्याने कुपोषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. याचा परिणाम जव्हार-मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागात होत आहे. पोषण आहारामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी-अधिक होते, मात्र मागच्या काही काळात हा आकडा फुलला असून, सेविकांच्या संपाचासुद्धा यावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

मोखाडा तालुक्यात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या २४, तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १५० वर पोहोचली आहे. याचप्रमाणे जव्हार तालुक्यातील अतितीव्र बालकांची संख्या ४६ आणि तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या तब्बल ६५३ आहे. मोखाडा आणि जव्हार तालुक्यात आजघडीला आरोग्यावर शासन यंत्रणेबरोबरच अनेक खासगी संस्थाही काम करत आहेत. याचबरोबर दररोज अनेक योजनांचा पाऊस पडत आहे. मात्र, या महिनाभराच्या आकडेवारीने शासनाचा कुपोषणमुक्तीचा दावा किती फोल आहे? हे प्रत्यक्ष सरकारी आकडेवारीतून समोर येत आहे.

उपचारांअभावी अनेकांचा मृत्यू वर्षभराआधी तालुक्यातील मरकटवाडी येथील गर्भवतीला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून बालकाचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी वेळेवर बस नसल्याने गर्भवती दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडली, तर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नाशिक जिल्हा रुग्णालय असा प्रवास करूनही रूपालीचा बाळासह मृत्यू झाला. त्यातच आता पुन्हा कुपोषणाचे दुष्टचक्र सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार