शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

‘पाडळे’त ८१ कोटींचे ‘सिंचन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:02 IST

कॅनॉलसह धरणाची तत्सम कामे अपूर्णच; घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर बजेट वाढले

- नारायण जाधव ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील पाडळे धरणासह तत्सम कामे पूर्ण होण्याआधीच धरणाचा खर्च मूळ अंदाजपत्रकापेक्षा तब्बल ८० कोटी ७१ लाख रुपयांनी वाढला आहे. या वाढीव खर्चास जलसंपदा विभागाने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली मंजुरी दिली आहे.जलसंपदा विभागाने १२ फेबु्रवारी २००३ रोजी पाडळे लघुपाटबंधारे योजनेस मान्यता दिली, तेव्हा त्याचा खर्च १३ कोटी २१ लाख गृहीत धरून त्यास प्रशासकीय मान्यता दिली. नंतर, खारभूमी विभागाने १९ जानेवारी २०१२ रोजी २००७-०८ ची दरसूची लक्षात घेऊन ४३ कोटी ४७ लाख रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मध्यंतरीच्या काळात दरसूचीत झालेला फरक, भूसंपादनात जमिनीचे वाढलेले मूल्य, संकल्पचित्रात झालेले बदल या कारणांमुळे आता त्याच्या अंदाजपत्रकात तब्बल ८० कोटी ७१ लाख रुपयांची वाढ करून ९३ कोटी ९२ लाख रुपयांच्या खर्चास द्वितीय सुधारित मान्यता दिली आहे. राज्यात सिंचन घोटाळे गाजत असतानाच पाडळे प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात तब्बल ८० कोटी ७१ लाख रुपयांची वाढ झाल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाडळे लघुपाटबंधारे प्रकल्प मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात डोंगरराजीत उभारला असून त्याखाली २१०० हेक्टर जमीन गेली आहे. त्यात हजार हेक्टर वनजमिनीचाही समावेश आहे. पाडळे, खुटरवाडी, ढेहरी आणि मिल्हे ही गावे आणि पाड्यांतील जमीन धरणाखाली गेली आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे कामे रखडलीमुरबाड तालुक्यातील पाडळे धरण प्रामुख्याने कृषी सिंचनासाठी बांधले असून परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकºयांनाही त्याचा आधार मिळणार आहे.धरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी कॅनॉलसह इतर तत्सम कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. यात, स्थानिकांचा होणारा विरोध हे एक प्रमुख कारण आहे.कॅनॉलची कामे अपूर्ण असल्याने सध्या तरी पाणी असून शेतकºयांना या धरणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सध्या धरणाचा मासेमारीव्यतिरिक्त अन्य उपयोग होत नाही. सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने येथे दुर्घटनाही घडत आहेत.

टॅग्स :thaneठाणे