ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८० कोरोनाचे नवे रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 07:58 PM2021-03-07T19:58:21+5:302021-03-07T19:58:42+5:30

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३०२ झाली आहे.  

780 new corona patients in Thane district in last 24 hours Three people died | ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८० कोरोनाचे नवे रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८० कोरोनाचे नवे रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७८० रुग्ण रविवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ६९ हजार ८४५ रुग्ण संख्या झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३०२ झाली आहे.  
 
          ठाणे शहरात १८५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ६८१ झाली आहे. शहरात एकही  मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०० झाली. कल्याण - डोंबिवलीत २७१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६४ हजार ६५७ रुग्ण बाधीत असून एक हजार २०७ मृत्यूची नोंंद आहे. 
            उल्हासनगरमध्ये १८ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९७५ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला चार बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३५ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५२ रुग्ण आढळले असून एक मृत्यू नाही.  या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ४८७ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

     अंबरनाथमध्ये ३१  रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ९५२ असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ५९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार १८४ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू  झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ कायम आहे. ग्रामीणमध्ये २० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत १९ हजार ६९३ झाले असून  आतापर्यंत ५९७ मृत्यू नोंदले आहेत.

Web Title: 780 new corona patients in Thane district in last 24 hours Three people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.