नौदलातील निवृत्त ७६ वर्षीय विद्यार्थी झाले १२ वी उत्तीर्ण
By धीरज परब | Updated: May 6, 2025 23:53 IST2025-05-06T23:53:02+5:302025-05-06T23:53:23+5:30
Mira Road News: मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्या पाकिस्तान युद्धात तर मुलगा निलेश हे कारगिल युद्धात देशासाठी लढले आहेत.

नौदलातील निवृत्त ७६ वर्षीय विद्यार्थी झाले १२ वी उत्तीर्ण
मीरारोड- मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्या पाकिस्तान युद्धात तर मुलगा निलेश हे कारगिल युद्धात देशासाठी लढले आहेत.
मूळचे जळगावचे असलेले गोरखनाथ मोरे यांचा जन्म १९४७ साली झाला. ११ वी पर्यंत शिक्षण घेतल्या नंतर देशाच्या सेवेसाठी ते नौदलात सामील झाले. नौदल मध्ये सेवा बजावू लागल्याने त्यांना त्यावेळी पुढील शिक्षण घेता आले नव्हते. नौदलात ३२ वर्ष सेवा बजावल्या नंतर ते १९९७ साली निवृत्त झाले. नौदलाच्या कुलाबा येथील वसाहतीतून ते मीरारोडच्या सर्वोदय संकुलात कुटुंबासह रहायला आले. त्यांचा मुलगा निलेश हे देखील नौदलात होते व १२ वर्षां पूर्वी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांची मुलगी आरती वाडकर ह्या डॉक्टर आहेत. नायगाव पश्चिम येथे त्यांचा दवाखाना आहे.
गोरखनाथ हे एका लीगल फर्म मध्ये नोकरीला असून त्यांना काम करताना वकील होण्याची इच्छा वाटू लागली. त्यासाठी १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. डॉ. आरती यांच्या दवाखान्यात नायगाव येथील ऋषि वाल्मिकी महाविद्यालयाचे संचालक रवी भाटकर हे गेले असता वडिलांना वकील व्हायचे आहे व त्यासाठी पुढील शिक्षण घ्यायचे असल्याचे डॉ. आरती यांनी सांगितले.
भाटकर यांनी त्यांना आवश्यक माहिती देत त्यांची कागदपत्रे बोर्डाच्या १२ वी परीक्षेसाठी दाखल केली. गोरखनाथ यांनी देखील काम सांभाळत घरीच अभ्यास केला. कोणतीही शिकवणी लावली नाही. मार्च २०२५ मध्ये त्यांनी वसईच्या न्यु इंग्लीश स्कुल मध्ये १२ वी बोर्डाची परीक्षा दिली. गोरखनाथ यांच्या १२ वी उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा आनांद झाला आहेच पण गोरखनाथ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांची नात काव्या हि १२ वी मध्ये गेली आहे तर नातू धैर्य व मोक्ष हे दोघे ९ वी मध्ये गेले आहे. आजोबा १२ वी झाल्याचा नातवंडांना अतिशय आंणफ झाला आहेच पण त्यांना आजोबांचे मोठे कौतुक वाटत आहे. शिकण्याची आपली पूर्वी पासून इच्छा होती. मला वकील व्हायचे आहे. त्यासाठी एमएच सीआयटीची परीक्षा देखील आपण दिल्याचे गोरखनाथ मोरे यांनी सांगितले.