734 patients found in Thane district Five people died | ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३४ कोरोना रुग्ण सापडले; पाच जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७३४ कोरोना रुग्ण सापडले; पाच जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ७३४ रुग्ण गुरूवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६३ हजार १४ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २५६ झाली आहे.  

ठाणे शहरात २२४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६१ हजार ७४५ झाली आहे. शहरात एकही  मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३८२ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत २२७ रुग्णांची आज वाढ झाली असून दोघांचा मृत्यू आहे. आता ६२ हजार ६०९ रुग्ण बाधीत असून एक हजार १९५ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये १६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ८०३ झाली. तर, ३७२ मृतांची संख्या आहे. भिवंडीला सहा बाधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे. आता बाधीत सहा हजार ७६९ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४  रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे.या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ९७० असून मृतांची संख्या ८०३ आहे.

अंबरनाथमध्ये १५ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ७६५ असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ३९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ८२१ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२६ आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ४८८ आणि आतापर्यंत ५९२ मृत्यू झाले आहेत.

Web Title: 734 patients found in Thane district Five people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.