ठाणे जिल्ह्यात ६७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:02 IST2021-06-03T21:01:41+5:302021-06-03T21:02:02+5:30
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता पाच लाखांवर.

ठाणे जिल्ह्यात ६७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३८ जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाचे गेल्या २४ तासांत ६७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता पाच लाख १९ हजार ६८२ झाली असून एकूण मृतांची संख्या आता नऊ हजार ३७० नोंदली गेली आहे.
जिल्ह्यात आढळून आलेल्या या रुग्ण संख्येपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १३१ रुग्ण सापडल्याने आता येथील रुग्ण संख्या एक लाख ३० हजार ६०७ झाली आहे. तर तीन रुग्ण दगावल्याने येथील एकूण मृतांची संख्या एक हजार ९११ झाली. कल्याण डोंबिवलीत २११ रुग्णांच्या वाढीसह २४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात एकूण रुग्ण एक लाख ३३ हजार ५०७ नोंदले असून दोन हजार ७१ मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरात ३९ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील २० हजार ५२० रुग्णांसह ४७५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीला १४ रुग्ण आढळले असून दोन मृत्य झाला. येथील रुग्ण संख्या आता १० हजार ४८२ झाली असून मृतांणी संख्या ४४३ नोंदली आहे. मीरा भाईंदर परिसरात ७४ रुग्णांच्या वाढीसह तीन जण दगावले आहेत. येथील एकूण रुग्ण संख्या ४९ हजार १८१ बाधितांसह एक हजार २८४ मृत्यूंची नोंद झाली आहे.
अंबरनाथ परिसरा १८ बाधितांसह एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. येथे आतापर्यंत १९ हजार ३४६ बाधितांसह ४०९ मृत्यू नोंदवले गेले. कुळगांव बदलापूरला २२ बाधीत आढळले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत २० हजार ६४८ बाधित झाले असून २५४ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील गांवपाड्यात ८४ बाधीत आढळल्यामुळे आता ३७ हजार ९५ नोंद झाली. सात जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९०२ झाली आहे.