ठाण्यात 611 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 7 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 19:33 IST2020-12-05T19:32:56+5:302020-12-05T19:33:00+5:30

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत 154 बाधितांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

611 new corona cases registered in Thane; 7 killed | ठाण्यात 611 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 7 जणांचा मृत्यू

ठाण्यात 611 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 7 जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असल्याचे रोजच्या आकडेवारी वरून दिसत आहे. आज ठाणे जिल्ह्यात 611 रुग्णांची तर 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 2 लाख 32 हजार 401 तर, मृतांची संख्या आता 5 हजार 733 झाली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत 154 बाधितांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 52 हजार 460 तर, 1249 जणांच्या  मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 109 रुग्णांची तर, 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत 169 रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये 63 रुग्णांची नोंद झाली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात 8 रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच उल्हासनगरमध्ये 37 रुग्णांची  नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्येही 20 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये 33 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 18 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 18 हजार 288 झाली आहे.

Web Title: 611 new corona cases registered in Thane; 7 killed