भिवंडीत लोक अदालतमध्ये पालिकेतील २३९ थकीत मालमत्तेचा ६० लाखांचा कर भरणा
By नितीन पंडित | Updated: December 9, 2023 19:24 IST2023-12-09T19:24:20+5:302023-12-09T19:24:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील २३९ थकीत ...

भिवंडीत लोक अदालतमध्ये पालिकेतील २३९ थकीत मालमत्तेचा ६० लाखांचा कर भरणा
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील २३९ थकीत मालमत्ता धारकांनी हजेरी लावत ६० लाख २० हजार ६९७ रुपयांचा कर भरणा केल आहे अशी माहिती पालिका कर मूल्यांकन विभाग प्रमुख सुदाम जाधव यांनी दिली आहे.
भिवंडी महापालिकेने २८ कोटी ४५ लाख ४० हजार ९२८ रुपये थकीत असलेल्या तब्बल ३१३१ थकबाकीदार मालमत्ता धारकांना लोक अदालती मध्ये उपस्थित राहण्यासाठी नोटीस धाडली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत प्रभाग समिती क्रमांक १ मधील ४३ मालमत्ताधारकांनी १२ लाख ६७ हजार ८३१ रुपये, प्रभाग समिती क्रमांक २ मधील ३३ मालमत्ताधारकांची १४ लाख ८९ हजार ८४३ रुपये, प्रभाग समिती क्रमांक ३ मधील १८ मालमत्ताधारकांनी ४ लाख ३१ हजार ५९६ रुपये, प्रभाग समिती क्रमांक ४ मधील ५७ मालमत्ता धारकांनी १२ लाख ६० हजार ८६ रुपये, प्रभाग समिती क्रमांक ५ मधील ८८ मालमत्ताधारकांनी १५ लाख ७१ हजार ३४१ रुपये मालमत्ता कर भरणा केला आहे.