शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार; सर्वाधिक महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 7:20 PM

भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत.

ठाणे - भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून, ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये ३३ लाख २१ह्जार ७५८ पुरुष, २७ लाख ७० हजार ९४९ महिला त्याचप्रमणे तृतीयपंथी ३४०, अनिवासी भारतीय ४०, सर्विसेसमधील १२२१ अशा मतदारांचा समावेश आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी दिली. 

यामध्ये सर्वाधिक ऐरोली मतदारसंघ ४ लाख ३४ हजार ९३५, मीरा भाईंदर ४ लाख 42 हजार २७९, कल्याण पश्चिम ४ लाख २८ हजार ८१४, ओवळा  माजिवाडा ४ लाख २१ हजार ११८, कल्याण ग्रामीण ४ लाख ३ हजार २०, मुरबाड ३ लाख ७८ हजार ५३०, बेलापूर ३ लाख ६८ हजार ५४३, मुंब्रा कळवा ३ लाख २८ हजार 450, अंबरनाथ ३ लाख २ हजार ५४६, कल्याण पूर्व ३ लाख ३३ हजार ९७१, डोंबिवली ३ लाख ३८ हजार २१७, कोपरी पांचपाखाडी ३ लाख 42 हजार ७९३, ठाणे ३ लाख १८ हजार ६७,  भिवंडी २ लाख ७९ हजार ३४०, शहापूर २ लाख ४४ हजार ९०, भिवंडी पश्चिम २ लाख ६४ हजार ६७८, भिवंडी पूर्व २ लाख ६३ हजार ६७, उल्हासनगर २ लाख २१ हजार ८५० अशी संख्या आहे. 

३४० तृतीयपंथी

३४० तृतीयपंथी यांची नोंदणी असून सर्वाधिक ८१ नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिम ७०, कल्याण ग्रामीण ५५ , ऐरोली २५ अशी आहे.

सर्वाधिक  महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये

सर्वाधिक २ लाख १ हजार ७८१ महिला मतदार कल्याण पश्चिम मध्ये असून , मीरा भाईंदर १ लाख ९६ हजार ६८४, ओवला माजिवडा १ लाख ९१ हजार ५७७, ऐरोली १ लाख ८५ हजार ८४१ अशी संख्या आहे. सर्वात कमी महिला मतदार ९९ हजार ६८२ उल्हासनगर येथे आहेत.

६ हजार ४८८ मतदान केंद्रे

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ६ हजार ४८८ मतदान केंद्रे असून मुरबाड मध्ये ४५६, ऐरोली 433, मीरा भाईंदर ४१६, कल्याण पश्चिम ४०९, ओवला माजिवडा ४०१, बेलापूर ३८६, मुंब्रा कळवा ३५१, ठाणे ३७७, कोपरी ३६८, कल्याण ग्रामीण 389, डोंबिवली ३०३, कल्याण पूर्व ३४५, अंबरनाथ ३०३ भिवंडी पश्चिम ३११, शहापूर ३२६, भिवंडी ग्रामीण ३४९, भिवंडी पूर्व २८८, उल्हासनगर २७७.

८८ टक्के फोटो ओळखपत्रांचे काम पूर्ण

मतदारांना छायाचित्त्रासह ओळखपत्रांचे काम ८७.३७ टक्के पूर्ण झाले असून १३ .९३ टक्के काम राहिले आहे. जे की लवकरच पूर्ण होईल. सर्वाधिक ९९.९९ टक्के काम भिवंडी पूर्व , ९८.७१ टक्के उल्हासनगर, ९८.५४ टक्के काम शहापूर, अंबरनाथ ९७.६२, मुंब्रा कळवा ९६.८६ टक्के, भिवंडी ग्रामीण ९६.४ टक्के, मीरा भाईंदर ९३.१३ टक्के, मुरबाड ९२.९७ टक्के, भिवंडी पश्चिम ९३.४३ टक्के, ठाणे ९०.३८ टक्के, ८०.७६ कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा ८८.९ टक्के, कोपरी पाचपाखाडी ८७.५० टक्के, बेलापूर ८३.६४ टक्के, ऐरोली ७८.४ टक्के, कल्याण पूर्व ७३.५९ टक्के, कल्याण पश्चिम ७३.42 टक्के येथे झाले आहे.

९ लाख ४३ हजार ३१० तरुण मतदार

युवा मतदारांनी नाव नोंदणीस चांगला प्रतिसाद दिला असून,  १८ ते १९ वयोगटात एकूण ४३ हजार ७५८ मतदार आहेत तर  २० ते २९ वयोगटात ८ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत. ३० ते ३९ या मध्यम वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९ तर ४० ते ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०, ५० ते ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६, तसेच ६० ते ६९ वयोगटात ६ लाख १३ हजार ६२९ , ७० ते ७९ वयोगटात २ लाख ७३ हजार ६८३ आणि ८० च्या पुढे १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत.     

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक