शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: September 15, 2022 19:30 IST

जादा परताव्याच्या अमिषाने ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. 

ठाणे : मासिक भिशी योजनेद्वारे १८ टक्के जादा परताव्याचे अमिष दाखवून तब्बल ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ रुपयांची फसवणूक करणाऱ्या एस कुमार ज्वेलर्सच्या श्रीकुमार शंकरा पिल्लई वय ६८ या ठकसेनाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली. या आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पिल्लई याने एस. कुमार ज्वेलर्स आणि एस. कुमार गोल्ड ण्ड डायमंड या नावाने सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने महाराष्ट्र राज्यासह देशातील इतर ठिकाणीही त्याची कार्यालय थाटली होती. अशाच प्रकारचे कार्यालय कल्याण पश्चिमेकडील झोझवाला हाऊस, शिवाजी चौक येथेही सुरु केले होते. त्याच्या दुकानात दागिने खरेदीसाठी येणाऱ्या गिऱ्हाईकांना तसेच दलालांमार्फत गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे त्याने अमिष दाखविले होते. गुंतवणूकदारांनी ११ महिने रक्कम भरल्यास बाराव्या महिन्याची रक्कम ही त्याने ज्वेलर्सच्या मार्फतीने भरुन जमा होणाऱ्या रकमेचे सोने खरेदी करता येईल, असे सांगितले होते. 

तसेच एक वर्षाच्या मुदतठेवी पोटी गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा म्हणून सुमारे १६ ते १८ टक्के दराने व्याज देण्याचेही अमिष दाखविले होते. अशा वेगवेगळया योजनांची बतावणी करीत अनेकांना गुंतवणुकीस त्याने प्रवृत्त केले. एक वर्षांच्या ठेवी स्वीकारल्यानंतर त्यांची मुदत संपल्यानंतरही मूळ रकमेसह मिळणाऱ्या व्याजाची रक्कमही पुन्हा मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यास तो प्रवृत्त करीत होता. गुंतवणुकदारांपैकीच एकाने त्याच्या योजनेमध्ये दहा हजार रुपये गुंतविले होते. 

मुदतीनंतरही योग्य परतावा न मिळाल्याने त्याने याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण करण्याच्या अधिनियमाप्रमाणे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाले होते. त्याने आतापर्यंत एक हजार २१६ गुंतवणूकदारांची ५७ कोटी ८९ लाख ३७ हजार ३७१ इतकी फसवणूक केली आहे. परंतु, ही रक्कम ७० कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मालमत्तेची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरातपिल्लई तसेच त्याच्या कंपनीच्या नावाने विविध बँकेतील २४ खात्यांमधील १२ लाख ८४ हजार ४७६ इतकी रक्कम गोठविली आहे. त्याच्या मालकीच्या संरक्षित केलेल्या मालमत्तेची सध्याची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात आहे. त्याला अशाच एका गुन्ह्यात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनेही अटक केली होती. हीच माहिती मिळाल्यानंतर ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांच्या पथकाने त्याला १३ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या संमतीने मुंबईतून अटक केली.

गुंतवणुकदारांनी संपर्क साधण्याचे आवाहनया योजनेमध्ये पिल्लई याच्याकडे मोठया प्रमाणात लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संख्येत व फसवणूक झालेल्यांच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांनी या योजनेमध्ये गुंतवणुक केली असेल त्यांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक