5754 corona patients found in Thane district; 24 deaths | CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७५४ रुग्ण सापडले; २४ मृतांच्या वाढीने चिंता  

CoronaVirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७५४ रुग्ण सापडले; २४ मृतांच्या वाढीने चिंता  

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार ७५४ रुग्ण शनिवारी वाढले आहेत. ता रुग्ण वाढीसह २४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आता तीन लाख ७३ हजार ३६४  रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ६८८ झाली आहे.   (5754 corona patients found in Thane district; 24 deaths)
 
          ठाणे शहरात एक हजार ४६४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ९४ हजार २६ झाली आहे. शहरात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४९८ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ९९६ रुग्णांची वाढ झाली असून तिघांचा मृत्यू आहेत. आता ९३ हजार ७७३ रुग्ण बाधीत असून एक हजार २८९ मृत्यूची नोंंद आहे. 
            उल्हासनगरमध्ये २१२ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १५ हजार ७९८ झाली. तर, ३८५ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १११  बाधीतसह दोघांचा मृत्यू आहे. आता बाधीत आठ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३७२ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४६१ रुग्ण आढळले असून सहा मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३४ हजार ६३५ असून मृतांची संख्या ८५८ आहे.

     अंबरनाथमध्ये ३२४ रुग्ण आढळला असून तीन मृत्यू आहे. येथे बाधीत १३ हजार ३३३ असून मृत्यू ३२२ आहेत. बदलापूरमध्ये १९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १४ हजार ४६५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२६ कायम आहे. ग्रामीणमध्ये १०१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत २२ हजार २६ आणि आतापर्यंत ६१९ मृत्यू झाले आहेत.

Web Title: 5754 corona patients found in Thane district; 24 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.