1 रुपयावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून ठाण्यात 54 वर्षाच्या व्यक्तिची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 20:30 IST2018-02-03T20:28:47+5:302018-02-03T20:30:58+5:30

एक रुपयावरुन झालेल्या भांडणातून ठाण्यात एका 54 वर्षीय व्यक्तिची हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

54-Year-Old Man Killed Over Re 1 In Thane | 1 रुपयावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून ठाण्यात 54 वर्षाच्या व्यक्तिची हत्या

1 रुपयावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून ठाण्यात 54 वर्षाच्या व्यक्तिची हत्या

ठळक मुद्देकाहीवेळाने गमने आणि त्यांचा मुलगा शिवीगाळ का केली म्हणून दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेले. दुकानदाराच्या मुलाने गमने यांना लाथा, बुक्क्यांनी जबर मारहाण केली.

ठाणे - एक रुपयावरुन झालेल्या भांडणातून ठाण्यात एका 54 वर्षीय व्यक्तिची हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मनोहर गमने रामबाग येथील एका दुकानात अंडी आणण्यासाठी गेले होते. त्यांनी दुकानदाराला एक रुपया कमी दिला त्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. दुकानदाराने गमने यांना शिवीगाळ केली. 

वाद वाढल्यानंतर गमने यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर काहीवेळाने गमने आणि त्यांचा मुलगा शिवीगाळ का केली म्हणून दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी पुन्हा एकदा शाब्दीक बाचबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. 

दुकानदाराच्या मुलाने गमने यांना लाथा, बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असे पोलीस अधिका-याने सांगितले. आरोपी सुधाकर प्रभू (45) याला पोलिसांनी अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: 54-Year-Old Man Killed Over Re 1 In Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.