शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ५१ लाखांची फसवणूक : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:42 IST

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळल्यानंतर त्यांना अनुजकुमार मलेशियाचा टुरिस्ट व्हिसा द्यायचा. प्रत्यक्षात तिथे कोणतीही नोकरी नसायची. लाखो रुपये घेऊनही त्यांचीच चौकशी सुरु व्हायची.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटची कारवाईचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पळून जाण्याच्या बेतात असतांनाच पोलिसांची कारवाई

ठाणे : परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या अनुजकुमार ठाकूर (२७, रा. उत्तर प्रदेश) आणि गौरवकुमार झा (२८, रा. बिहार) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने सोमवारी अटक केली. त्यांनी आतापर्यंत ४० तरुणांकडून अशा प्रकारे ५१ लाख १० हजारांची फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अनुजकुमार आणि त्याच्या साथीदारांनी कापूरबावडी, सिनेवंडर मॉल येथील एका गाळ्यामध्ये एम ग्रोथ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. नावाची कंपनी थाटली होती. याच कंपनीची यू-ट्युबवर जाहिरातही त्यांनी केली होती. मलेशियासारख्या देशात चांगल्या वेतनाची नोकरी असून त्याठिकाणी नोकरी लावण्याबाबतची व्हिडीओ क्लिप तयार करून ती ते यू-ट्युबवर टाकत असत. ती पाहून अनेक बेरोजगार तरुणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यापैकीच विक्रमकुमार भाटी यांनाही त्यांनी असेच आमिष दाखवले. आॅक्टोबर २०१८ ते एप्रिल २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडून वेगवेगळ्या दिवशी टप्प्याटप्प्याने दोन लाख ६० हजारांची रक्कम घेतली. इतकी रक्कम घेऊनही त्यांना नोकरीलाही लावले नाही. शिवाय, वारंवार तगादा लावून त्यांना त्यांचे पैसेही परत केले नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भाटी यांनी याप्रकरणी २२ एप्रिल २०१९ रोजी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्या पथकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनुजकुमार आणि गौरवकुमार या दोघांना त्यांच्या सिनेवंडर मॉलमधील कार्यालयातून २२ एप्रिल रोजी अटक केली. त्यांनी आतापर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांची ५१ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.................................तरुणांना दिला जायचा टुरिस्ट व्हिसापरदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळल्यानंतर त्यांना अनुजकुमार मलेशियाचा टुरिस्ट व्हिसा द्यायचा. हाच व्हिसा घेऊन बेरोजगार तरुण मलेशियात जायचे. तिथे गेल्यानंतर मात्र कोणतीही अधिकृत नोकरी मिळण्याऐवजी त्यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत होते. तशी अधिकृत कागदपत्रेही त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना मलेशियाच्या विमानतळावरूनच माघारी फिरण्याचे सूचित केले जात होते. अशा अनेकांची या भामट्यांनी फसवणूक केल्याचे आता तपासात समोर येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी