शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

ठाणे महापालिकेचा ५,०२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर; आरोग्य, पार्किंग व्यवस्था सुधारण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:01 IST

ठाणे : कोणतीही करवाढ व नवी योजना जाहीर न करतानाच काटकसरीला प्राधान्य देत महसुली उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठाणे महापालिकेने ...

ठाणे : कोणतीही करवाढ व नवी योजना जाहीर न करतानाच काटकसरीला प्राधान्य देत महसुली उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठाणे महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ठेवले आहे.  महिलांचे सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक व युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे, आरोग्यव्यवस्था, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था सुधारण्यावर भर दणे, भांडवली कामे पूर्ण करणे, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविणे आणि शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा उत्तम राहावा, याकडे विशेष भर असणारा ५०२५ कोटी एक लाख रुपयांचा अर्थसंकल्प ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी सादर केला. अर्थसंकल्पात महसुली खर्च ३३४५ कोटी ६६ लाख, भांडवली खर्च १६७९ कोटी, अखेरची शिल्लक ३५ लाख असा एकूण ५०२५ कोटी एक लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२३-२४ मध्ये ४३७० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात यंदा सुमारे ६५५ कोटींची वाढ दिसून आली. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा आकार, अग्निशमन दल, जाहिरात, स्थावर मालमत्ता आदी विभागांच्या उत्पन्नात घट येत असली तरी शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न ३१६० कोटी १६ लाखांऐवजी ३०९२ कोटी ३९ लाख सुधारित करण्यात आले. महापालिकेने अपेक्षित केलेल्या ४६० कोटी पाच लाखांच्या अनुदानात वाढ होऊन ६९७ कोटी ९८ लाख झाले. सुधारित अर्थसंकल्पात अनुदानापोटी ११५८ कोटी तीन लाख रुपये अपेक्षित धरले आहेत. डिसेंबर २०२३ अखेर ९८९ कोटी २९ लाख अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानातील अखर्चित रकमा २०२३-२४ च्या आरंभीच्या शिलकी रकमेमध्ये समाविष्ट आहे. खर्चात २०२३-२४ मध्ये महसुली खर्च २७०८ कोटी ८३ लाख अपेक्षित केला होता. तो सुधारित अर्थसंकल्पात २६७२ कोटी ७९ लाख अपेक्षित असून, भांडवली खर्च १६६० कोटी ९१ लाखऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने तो २०४९ कोटी ४३ लाख सुधारित करण्यात आले आहे. यात अतिरिक्त खर्च करणे टाळण्यात आले आहे.

मालमत्ता कराचे उत्पन्न वाढवणार मालमत्ता करापोटी २०२३-२४ मध्ये ७६१ कोटी ७२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. डिसेंबरअखेर ४८१.३६ कोटी उत्पन्न प्राप्त झाल्याने या करापासून ७३८ कोटी ७१ लाख सुधारित उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे. मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी सवलत योजना लागू केली होती. मालमत्ता करावरील शास्ती व व्याजमाफीचा लाभ करदात्यांना झाला. २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराचे उत्पन्न ८१९ कोटी ७१ लाख अपेक्षित आहे. वाढीव मागणी व त्यातून वाढणाऱ्या उत्पन्नातील भागीदारी तत्त्वावर मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे व त्यातून वाढ, मालमत्ता कराचा डेटा हा इतर विभागाच्या डेटासोबत तुलनात्मक पुनर्पडताळणी करणे, त्यातून मालमत्ता कराचा डेटा सुधारित होऊन मालमत्ता कराच्या मागणीत वाढ होणार आहे.

पाणीपुरवठा विभागाची वसुली चिंतेची बाब- पाणीपुरवठा विभागाला २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु जेमतेम ६३.७६ कोटींची वसुली झाल्याने यंदा २२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाणी बिलाच्या वसुलीसाठी दंडात्मक कारवाई करण्याबरोबर नळजोडणी खंडित करण्यावर भर दिला जाणार आहे. - अनधिकृत मालमत्तांवर शास्ती कर लावून मालमत्ता व पाणी बिलाची वसुली त्याच पद्धतीने करण्याचे निश्चित केले आहे. 

शासनाच्या अनुदानावर मदारपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला असला तरी जीएसटी, मुद्रांक शुल्क आदींसह इतर अनुदानापोटी सुमारे १३०० कोटी रुपये शासनाकडून मिळणे अपेक्षित आहेत. पालिका काही नवीन प्रकल्प हाती घेणार असून, त्यासाठी हा निधी आवश्यक आहे.

स्थानिक संस्था करस्थानिक संस्था कर अनुदानातून १०५७ कोटी ७९ लाख, मुद्रांक शुल्क अधिभारापोटी २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली १० कोटी असे एकूण १२६७ कोटी ७९ लाख उत्पन्न अपेक्षित होते. २०२४-२५ या वर्षात अनुदानापोटी ११४२.४२ कोटी, मुद्रांक शुल्क अधिभारापोटी २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली ८ कोटी असे १३५०.४२ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.

ठाणे महापालिकेवर ९२.६२ कोटींचे कर्ज- महापालिकेची आर्थिक स्थिती सावरताना दिसून येत नाही. महापालिकेवर आजमितीला ९३.६२ कोटींचे कर्ज आहे.- यात केंद्र शासनाने अमृत २ अंतर्गत पाणीपुरवठा विस्तारासाठी ३२३ कोटी रकमेचा ‘डीपीआर’ मंजूर केला.-  या अंतर्गत केंद्र शासनाचा २५ टक्के, राज्य शासनाचा २५ आणि महापालिकेचा ५० टक्के हिस्सा असणार आहे. महापालिका हिश्श्यातील रक्कम ही म्युनिसिपल बॉण्ड उभारून किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका