घरातून ५० हजारांच्या ऐवजाची चोरी
By Admin | Updated: January 13, 2017 06:34 IST2017-01-13T06:34:00+5:302017-01-13T06:34:00+5:30
कळवा-शास्त्रीनगर येथील साईश्रद्धा इमारतीमधील घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी

घरातून ५० हजारांच्या ऐवजाची चोरी
ठाणे : कळवा-शास्त्रीनगर येथील साईश्रद्धा इमारतीमधील घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सहा हजारांच्या रोकडसह ४० हजारांचे सोन्याचे दागिने अशी ५१ हजारांच्या ऐवजाची चोरी केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईश्रद्धा इमारतीमधील रहिवासी अर्चना माने या १० जानेवारी रोजी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या
होत्या.
त्याचदरम्यान त्यांची बहीण प्रियंका आणि मुलगीही बाहेर गेल्या. हीच संधी साधून चोरट्यांनी आत शिरकाव करून दिवसाढवळ्या घरातील ऐवज लुबाडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी.सी. देवकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)