उल्हासनगरात ५ हजार लिटर गावठी दारू जप्त

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2024 20:16 IST2024-03-03T20:16:04+5:302024-03-03T20:16:32+5:30

सचिन थोरवडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

5 thousand liters of liquor seized in Ulhasnagar | उल्हासनगरात ५ हजार लिटर गावठी दारू जप्त

उल्हासनगरात ५ हजार लिटर गावठी दारू जप्त

उल्हासनगर : कॅम्प नं-५, सहयाद्रीनगर मयुरेश कॉलनी येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी धाड टाकून १ लाख ७० किंमतीची तब्बल ५ हजार लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

उल्हासनगर पुर्व येथील सहयाद्रीनगर मयुरेश कॉलनी येथे गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार माहितीच्या आधारे पथकाने शनिवारी धाड टाकून ५ हजार लिटरचा गावठी दारूचा साठा जप्त केला. गावठी दारूची किंमत १ लाख ७० हजार असून गावठी दारू प्लास्टिक ड्रम मध्ये भरून ठेवली होती. याप्रकरणी सचिन थोरवडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 5 thousand liters of liquor seized in Ulhasnagar