कंटेनरमधील मालाची चोरी करणाऱ्या ५ चोरट्यांना अटक; पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By नितीन पंडित | Updated: November 26, 2022 18:40 IST2022-11-26T18:38:39+5:302022-11-26T18:40:04+5:30
किराणा मालासह दोन दुचाकी असा १० लाख ७५ हजार ६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

कंटेनरमधील मालाची चोरी करणाऱ्या ५ चोरट्यांना अटक; पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी - उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या कंटेनरमधील किराणा मालाची चोरी केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी भिवंडीतील रांजनोली नाका उड्डाणपुलाजवळ घडली होती. याप्रकरणी ट्रक चालकाने कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल करताच कोनगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात किराणा माल चोरी प्रकरणी पाच जणांना अटक केली असून चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेला ट्रक व किराणा मालासह दोन दुचाकी असा १० लाख ७५ हजार ६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
आलीम फिरोज खान वय २८ वर्षे रा. राहुजीनगर,कल्याणरोड, आसीफ अस्लम शेख वय ३५ वर्षे रा. लकड़ा मार्केट, अर्जुन बबन कनोजीया वय २९ वर्षे रा. लकड़ा मार्केट, सुलतान मोहम्मद इकबाल पटेल वय २९ वर्षे रा. शास्त्रीनगर व विशाल सुरेश भोईर वय २८ वर्षे रा. सरवली पाडा,भिवंडी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ट्रक ड्रायव्हर सुरेश बच्चाई पाल, वय ३९ याने रांजनोली नाका, वाटीका हॉटेल जवळ २० नोव्हेंबरला रात्रौ नऊ वाजता टाटा कंपणीचा कंटेनर उड्डाणपुलालगत उभा करुन ठेवला असता २२ नोव्हेंबरला सकाळी सहा वाजता कंटेनर पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडुन गाडीतील २ लाख ९९ हजार ४४० रुपये किंमतीचा डी. मार्ट किराणा माल चोरीस गेल्याची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात दिली असता वरिष्ठ पोलीस निरोधक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व तपास पथकातील अंमलदार अंमलदार यांनी गोपनीय सुत्रांचे माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषन करुन नमुद गुन्हयातील खालील आरोपीतांना व त्यांनी चोरी केलेला माल व गुन्हयात वापरलेला टेम्पो व दोन मोटार सायकल असे एकुण १० लाख ७५ हजार ६५७ रुपये किंमतीचा मुद्देमाल अवघ्या २४ तासात जप्त केला.