उल्हासनगरात दुप्पट पैसे करून देतो, असे आमिष दाखवून ५ लाखाची फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: December 19, 2022 17:42 IST2022-12-19T17:40:59+5:302022-12-19T17:42:14+5:30
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात दुप्पट पैसे करून देतो, असे आमिष दाखवून ५ लाखाची फसवणूक
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-५ परिसरात राहणारे प्रभाकरन कुणतली यांना दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी ५ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात प्रभाकरण कुणतली हे कुटुंबासह राहतात. त्यांचा भाचा सुमित कैनादत्त याने प्रभाकरण यांना कॅम्प नं-४ येथे घरी बोलावून राजू पांडुरंग भोईर व सुदेश मोतीराम भोईर यांच्याशी ओळख करून दिली. झटपट श्रीमंत होण्यासाठी भोईर दुप्पट पैसे करून देतात. याची माहिती दिली. १०० रुपयांचे दुप्पट करून दिल्यावर, प्रभाकरण यांचा विश्वास बसला. त्यासाठी लागणारे सामान जमवाजमव करण्यासाठी प्रभाकरण यांनी भाचा सुमित कैनादत्त यांच्या मार्फत १५ हजार रुपये बँकेत टाकले. त्यानंतर राहिलेले ४ लाख ८५ हजार रुपयांची जुळवाजुळव करून बायकोचे दागिने सोनारकडे गहाण टाकून काही पैसे उसने घेतले. असे एकून ५ लाख रुपये राजू व सुदेश भोईर यांच्याकडे दिले. हा प्रकार २५ जून २०२१ ते ३० जून २०२२ दरम्यान घडला आहे.
दुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने घेतलेले पैसे हातचलाखीने काढून त्याजागी पांढऱ्या कागदाचे गठ्ठा एका प्लास्टिक पिशवीत ठेवले. एक दिवस पूर्ण झाल्यावरच प्लास्टिक पिशवीत ठेवलेल्या नोटाला हात लावण्याची ताकीद भोईर बंधूंना देण्यात आली. त्यांना संशय आल्यावर त्यांनी प्लास्टिक पिशवी तपासली असता नोटा ऐवजी प्लास्टिक पिशवीत कागदाचे तुकडे दिसले. त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी भोईर यांच्यासह तिघांवर गुन्हे दाखल केले. तसेच इतरांनाही असेच फसविले का? याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"