शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:07 IST

Covid-19 Death In Thane: ठाणे जिल्ह्यातील एका ४३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठाणे जिल्ह्यातील एका ४३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. विनीत किणी असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. हा रुग्ण नायगावजवळील खोचिवडे गावात वास्तव्यास होता. न्यूमोनियाच्या उपचारासाठी त्याला मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विनीतला ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने त्याला वसई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला माहिम येथील रहेजा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्यासह प्रशासन नागरिकांना लक्षणे आढळल्यास कोविड-१९ चाचणी घेण्याचे आवाहन करत आहे. ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. यातील १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ३२ जण घरीच उपचार घेत आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मुंबई आणि ठाण्यात वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड तयार करण्यात येत आहेत.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढदेशातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९६१ वर पोहोचली आहे. रविवारपासून २०३ नव्या रुग्णांची भर पडली. देशात सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळून आली. केरळ १ हजार ४३५ रुग्णांसह आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र ५०६ रुग्णांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ३३८ आणि ३३१ रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकमध्ये २५३ रुग्णांची नोंद करण्यात आली आणि तामिळनाडूमध्ये १८९ रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणेDeathमृत्यू