शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'उच्च न्यायालयात 400 जागा रिक्त, 3 कोटींपेक्षा अधिक खटले प्रलंबित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 20:20 IST

राज्यात वाणिज्य न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करून जिल्हा पातळीवर वाणिज्य न्यायालये स्थापन केली. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये या न्यायालयांसमोरील प्रलंबित खटल्यांची संख्या 123 टक्क्यांनी वाढून 39 हजारांवर गेली आहे. देशात न्यायमूर्तींच्या 400 जागा रिक्त आहेत.

कल्याण- राज्यात वाणिज्य न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करून जिल्हा पातळीवर वाणिज्य न्यायालये स्थापन केली. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये या न्यायालयांसमोरील प्रलंबित खटल्यांची संख्या 123 टक्क्यांनी वाढून 39 हजारांवर गेली आहे. देशात न्यायमूर्तींच्या 400 जागा रिक्त आहेत. संसदीय समतीच्या शिफारशीनुसार या रिक्त जागा त्वरीत भराव्यात अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केली. अन्यथा, वाणिज्य न्यायालये अपयशी ठरतील, या मुद्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.    न्यायालयातील खटल्यांचा निपटारा वर्षानुवर्षे होत नसल्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत गुंतवणूकदारांच्या मनात शंका उत्पन्न होतात. त्याचा परिणाम देशातील गुंतवणुकीवर आणि अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे, वाणिज्य खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा पातळीवर वाणिज्य न्यायालये स्थापन करण्यासाठी संसदेने 2015 साली कायदा केला. 1 कोटी रुपयांवरील व्यवहारांचे खटले वाणिज्य न्यायालयात चालवण्यात येतात. ही मर्यादा 1 कोटीवरुन तीन लाखांवर आणण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करत असून या दुरुस्ती विधेयकावर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेवेळी खासदार शिंदे यांनी प्रलंबित खटले 3 कोटीहून अधिक असल्याची माहिती दिली. तसेच न्यायाधीशांच्या जागा न भरल्याने हे खटले प्रलंबित राहत आहेत. विशेष म्हणजे उच्च न्यायालयांमध्ये 41 टक्के, तर कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. देशातील 24 उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या 400 हून अधिक जागा रिक्त आहेत. कायदा व न्याय विषयक संसदीय स्थायी समितीने न्यायाधीशांच्या जागा भरण्याची शिफारस केली आहे. तर 2018 च्या ताज्या अहवालातही पुन्हा ही शिफारस करण्यात आल्याचे शिंदे यांनी संसदेत सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयShrikant Shindeश्रीकांत शिंदे