4 वर्षीय मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 10:25 PM2018-11-24T22:25:24+5:302018-11-24T22:25:56+5:30

न्यायालयाच्या आदेशानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी

4 year old girl raped by 14 year old boy | 4 वर्षीय मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून बलात्कार

4 वर्षीय मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून बलात्कार

Next

मीरारोड - सार्वजनिक शौचास गेलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी 14 वर्षाच्या मुलास ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार  त्याला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. 

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारी पीडित मुलगी गुरुवारी सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडायला लागल्याने पालक व शेजाऱ्यांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेने खळबळ उडाल्यानंतर संतप्त पालक व शेजाऱ्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर आरोपी मुलावर बलात्कार व पॉक्सोखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे तपास करत आहेत. 

Web Title: 4 year old girl raped by 14 year old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.