कळवा रुग्णालयातील मृत्यू थांबेनात; आजही ४ जणांचा मृत्यू
By अजित मांडके | Updated: August 14, 2023 13:50 IST2023-08-14T13:49:25+5:302023-08-14T13:50:43+5:30
गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

कळवा रुग्णालयातील मृत्यू थांबेनात; आजही ४ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आजही या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला असताना, सोमवारी पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती दिली गेली आहे. तर एक रुग्ण मृत अवस्थेत आणण्यात आला होता अशी माहिती डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. तसेच एक रुग्णावर मेडिकल उपचार सुरू होते. एक आयसीयू मधील रुग्णाचा समावेश आहे.