उल्हासनगर : चोरट्यांनी कारची काच फोडून लेदर बॅगमधील ४ लाखाची रोखड केली लंपास

By सदानंद नाईक | Updated: April 4, 2023 18:10 IST2023-04-04T18:10:49+5:302023-04-04T18:10:56+5:30

कॅम्प नं-३ कल्याण ते बदलापूर रस्त्यावरील अल्ट्राटेक सिमेंटच्या दुकाना समोर मयूर आर्थवानी यांनी सायंकाळी सात वाजता कार पार्किंग केली.

4 lakh cash stolen from the car, | उल्हासनगर : चोरट्यांनी कारची काच फोडून लेदर बॅगमधील ४ लाखाची रोखड केली लंपास

उल्हासनगर : चोरट्यांनी कारची काच फोडून लेदर बॅगमधील ४ लाखाची रोखड केली लंपास

उल्हासनगर - कॅम्प नं-३ कल्याण ते बदलापूर रस्त्यावरील अल्ट्राटेक सिमेंटच्या दुकाना समोर मयूर आर्थवानी यांनी सायंकाळी सात वाजता कार पार्किंग केली. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून पैशाची लेदर बॅग घेऊन पळून गेला असून बॅग मध्ये ४ लाख ४ हजार ५०० रुपये होते. 

उल्हासनगर मधील कल्याण ते बदलापूर रस्त्यावर मोठे मार्केट थाटले असून शेकडो नागरिक याच रस्त्याने जातात. सोमवारी सायंकाळी सात वाजता मयूर आर्थवानी हे काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यांनी अल्ट्राटेक सिमेंट दुकाना समोर कार उभी करून शेजारी दुकानात गेले.

यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी कारचा काच फोडून कारच्या सीटवर ठेवलेली पैशाची लेदर बॅग घेऊन पलायन केले. चोरीचा प्रकार उघड झाल्यावर त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. मध्यवर्ती पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोराचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: 4 lakh cash stolen from the car,