शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

जिल्ह्यात २६,६४४ हेक्टर भातपिकाला बसला फटका; सर्वपक्षीय नेते मात्र सत्तास्थापनेत व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 23:41 IST

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

सुरेश लोखंडे 

ठाणे : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून बचावलेल्या व हाताशी आलेल्या पिकांचे पुन्हा सध्याच्या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसामुळे २६ हजार ६४४ हेक्टरील भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी सत्ता स्थापनेचे राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त असताना कृषीयंत्रणा शेतावर जाऊन पंचनामा करत असल्याचे दिसत आहे.

किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या क्यार वादळामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यातील ५५ हजार २३५ हेक्टर भातशेतीपैकी २६ हजार ६४४ हेक्टर शेतीचे या पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान कृषी विभागाने ३१ आॅक्टोबर अखेर १३ हजार ५१५ हेक्टर शेतीचे पंचनामे केले आहे. तर उर्वरित १३ हजार हेक्टरवरील भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी जिल्ह्यात कृषी यंत्रणा तैनात आहे. अगामी चार दिवसांत उर्वरित सर्व पंचनामे होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

२६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यानच्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३९८ गावे बाधीत झाले आहेत. याशिवाय १७ हजार १४३ शेतकºयांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनीवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकºयांसह अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या २६ हजार ६४४ हेक्टरच्या शेतकºयांना आता एकाच वेळी भरपाई मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाच्या नुकसानीचाही आढावा घेऊन भरपाईच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील २६ हजार ६४४ हेक्टर भातशेतीला बसला आहे. यापैकी आतापर्यंत २३ हजार ५१५ हेक्टरवरील भातपिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित १३ हजार १२३ हेक्टरवरील पंचनामे कृषी विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

शहापूरमध्ये सर्वाधिक नुकसानअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भातशेतीपैकी शहापूर तालुक्यातील सर्वाधिक सात हजार ९०० हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. यापैकी आतापर्यंत चार हजार ६० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील सात हजार ३५० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ६२० हेक्टरचे पंचनामे गुुरुवारपर्यंत पूर्ण झाले आहेत.

मुरबाड तालुक्यातील सहा हजार ७०० हेक्टरवरील नुकसानीपैकी तीन हजार ४१७ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. तर अंबरनाथमधील दोन हजार ४६० हेक्टरच्या नुकसानीपैकी एक हजार २४८ हेक्टरचे पंचनामे झाले. याप्रमाणेच कल्याण तालुक्यातील दोन हजार १४४ हेक्टरपैकी एक हजार १३४ आणि ठाणे तालुक्यातील ९० हेक्टरपैकी ३६ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.नागली-वरईलाही नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकाºयांना साकडेअवकाळी पावसामुळे भात पिकाबरोबरच नागली, वरईसह अन्य पिकांच्या नुकसानीचीही भरपाई देण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार व कृषी समिती सभापती किशोर जाधव यांनी केली आहे. यंदा मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया गेले आहे. मुरबाड व शहापूरसह भिवंडी तालुक्यात हजारो शेतकºयांचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे.

शेतकºयांना मोठा आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात प्रामुख्याने भाताच्या नुकसानभरपाई प्रमाणेच नागली, वरई व अन्यही खरीप पिकांची नुकसानभरपाई महसूल विभागाने द्यावी, अशी मागणी पवार यांचसह जाधव यांनी जिल्हाधिकाºयांकडे लावून धरली आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षत्रावर पेरणी झाली आहे. त्यात साधारणत: भाताची अंदाजे ५९ हजार २७९ हेक्टरवर लागवड झाली. तर नागलीसाठी दोन हजार २६०हेक्टरवर पेरण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी पुरक उत्पन्न म्हणून वरईचीही लागवड केली आहे. या पिकांना मात्र अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने भाताबरोबरच नागली, वरईचेही तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस