घराला लागलेल्या आगीत ४ बकऱ्यांचा मृत्यू; मुंब्र्यात रात्री घडली घटना

By कुमार बडदे | Updated: May 12, 2023 10:08 IST2023-05-12T10:08:37+5:302023-05-12T10:08:42+5:30

या आगीत घरामध्ये असलेल्या चार बक-याचा जळून मृत्यू झाला असून,घरातील इतर  साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले

4 goats die in house fire; The incident happened at night in Mumbra | घराला लागलेल्या आगीत ४ बकऱ्यांचा मृत्यू; मुंब्र्यात रात्री घडली घटना

घराला लागलेल्या आगीत ४ बकऱ्यांचा मृत्यू; मुंब्र्यात रात्री घडली घटना

मुंब्रा - घराला लागलेल्या आगीत चार बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री मुंब्र्यात घडली. यामुळे स्थानिक नागरीक हळहळ व्यक्त करत होते. येथील बायपास रस्त्या जवळ असलेल्या मुंब्रादेवी मंदिर परीसरातील कैलास गिरी नगर मध्ये असलेल्या मैमुना या महिलेच्या १० बाय २० फूट आकाराच्या घराला गुरुवारी रात्री आग लागली.

या आगीत घरामध्ये असलेल्या चार बक-याचा जळून मृत्यू झाला असून,घरातील इतर  साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले आहे. मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानी रात्री उशिरा आगीवर  नियंत्रण मिळवून ती पूर्णपणे विझवली असल्याची  माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागातील अधिका-यांनी दिली.

Web Title: 4 goats die in house fire; The incident happened at night in Mumbra