शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे 35 आमदार नाखूश! मनसेबाबत बाळगले मौन; नारायण राणेंनी घेतला ठाकरेंचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:23 IST

ठाण्यातील वर्तकनगर येथील 22 व्या मालवणी महोत्सवास शनिवारी रात्री भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाणे : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे 54 पैकी 35 आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत बोलण्यास नकार देऊन यावर पक्षाचे प्रमुखच बोलतील, असेही ते म्हणाले.

ठाण्यातील वर्तकनगर येथील 22 व्या मालवणी महोत्सवास शनिवारी रात्री भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे पितापुत्रावर टीका केली. या सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा करून जो शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, त्यात अंतिम तारखेचा उल्लेख नाही. यामुळे ती कधी मिळेल, हे सांगता येत नाही. तसेच भाजप कोणाकडे गेला नव्हता, तर शिवसेना स्वत: त्यांच्याकडे आली होती. भाजप केंद्रात सत्तेत असून महाराष्ट्रातदेखील सर्वाधिक आमदार आहेत. यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही, असेही राणे म्हणाले.

आदित्य यांनी आधी मंत्र्याची जबाबदारी पार पाडावी या सरकारला गांभीर्य नाही. प्रशासन काय असते, विकास कसा करायचा, हे ठाऊक नसलेल्या माणसाच्या हातात सत्ता गेली असून त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, असे ते म्हणाले. या सरकारला दोन महिने मंत्रिमंडळ जाहीर करायला लागले, असा आरोपही राणे यांनी केला. तर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ट्विटबाबत विचारणा केल्यावर त्यांनी शिकवायची गरज नाही, भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. त्यांना कायदा काय, हे माहीत आहे. जी मंत्र्याची जबाबदारी आहे, ती त्यांनी आधी पार पाडावी. जबाबदारीबाबत काय कळते, हे आधी बघावे. नंतरच, भाजपविषयी बोलावे, अशा शब्दांत राणे यांनी आदित्य यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसे