ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३४८ रुग्ण आढळले; ११ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:48 IST2020-12-29T19:39:22+5:302020-12-29T19:48:20+5:30
उल्हासनगरला आठ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ३२९ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३५८ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला तीन बधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३४८ रुग्ण आढळले; ११ जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मंगळवारी ३४८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४२ हजार ४४५ रुग्ण संख्या झाली आहे. आज ११ मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ९४० झाली आहे. ठाणे परिसरात ११८ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आता ५५ हजार २०० बाधीत झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे शहरातील मृतांची संख्या एक हजार ३०२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७८ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहे. या शहरात ५७ हजार २९८ बाधीत झाले असून एक हजार १०० मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
उल्हासनगरला आठ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ३२९ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३५८ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला तीन बधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे. आता बाधीत सहा हजार ५९७ झाले असून मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ३० रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. या शहरात २५ हजार ३५८ बाधितांसह ७८२ मृतांची नोंद आहे. अंबरनाथमध्ये सात रुग्णांची नव्याने वाढ झाली असून दोन मृत्यू आहे. येथे बाधितांची संख्या आठ हजार २४२ झाली असून ३०२ मृत्यू नोंदले आहेत. बदलापूरला २४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे आठ हजार ८२४ बाधीत झाले आहेत. या शहरात एक मृत्यू असल्याने मृत्यूची संख्या ११५ झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २० मृतांची नोंद झाली असून एक मृत्यू झाला. आता बाधीत १८ हजार ७४६ झाले असून मृत्यू ५८० नोंदले आहेत.