उल्हासनगरात ३२०० लिटर गावठी दारू नष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 15:58 IST2020-12-15T15:58:16+5:302020-12-15T15:58:26+5:30
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगरूळ गाव शिवारातील गावठी दारूचा अड्डा शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर व हिललाईन ...

उल्हासनगरात ३२०० लिटर गावठी दारू नष्ठ
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगरूळ गाव शिवारातील गावठी दारूचा अड्डा शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उल्हासनगर व हिललाईन मदतीने उध्दवस्त केला. २६०० लिटर कच्ची व रबरी ट्यूब मध्ये ठेवलेली ६०० लिटर गावठी दारू नष्ठ करून तिघांना अटक केली आहे.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तावडे यांना मांगरुळ गाव हद्दीतील शिवारात गावठी दारूचा अड्डा राजरोसपणे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुन्हे अन्वेषण विभागाचे हिललाईन व उल्हासनगर पोलिसांच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी गावठी दारूच्या अड्ड्यावर संयुक्त कारवाई करीत धाड टाकली. तेंव्हा २०० लिटरच्या एकून १० प्लास्टिक ड्रम मध्ये कच्ची तर रबर ट्यूब मध्ये एकूण ६०० लिटर गावठी दारू मिळून आली.
पोलिसांनी एकूण ७२ हजार किंमतीची एकूण ३२०० लिटर गावठी दारू नष्ठ केली. तसेच गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त केला. मांगरूळ गाव शिवारातील गावठी दारूचा अड्डा चालविणाऱ्या संदीप, सचिन व हनुमंत पाटील यांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.