उल्हासनगरात भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी
By सदानंद नाईक | Updated: December 18, 2023 10:02 IST2023-12-18T09:40:48+5:302023-12-18T10:02:34+5:30
आज पहाटे उल्हासनगर येथे भीषण अपघात झाला. एका मद्यधुंद चालकाने सात वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे.

उल्हासनगरात भीषण अपघात! मद्यधुंद कार चालकाच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर परिसरातील रेमंड दुकानाच्या समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत रिक्षातील ३ जणांचा मृत्यू तर ३ जण जखमी झाले. जखमींवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्हासनगर शांतीनगर येथील रेमण्ड दुकांना समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालकाने दोन रिक्षा व काही कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका रिक्षाचा चुराडा झाला असून अपघातात राधाश्याम चव्हाण यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. तर प्रमोद शिवाजी दौड, महेंद्र भरत पांढरे व जावेद सय्यद हे गंभीर जखमी झाले. अपघातात दोन रिक्षांव काही कारचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ठेवण्यात आले. मध्यवर्ती पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आहेत. मद्यधुंद कार चालकाचा पोलीस शोध घेत असून तोही गंभीर जखमी झाला असावा. असा पोलिसांचा कयास आहे.