अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 22:53 IST2021-09-12T22:51:46+5:302021-09-12T22:53:55+5:30

अंबरनाथ एमआयडीसी रोडवर भरधाव झायलोची रिक्षाला जोरदार धडक

3 died on the spot in car auto collision in ambarnath | अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू 

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू 

अंबरनाथ: अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू  झाला आहे. अपघातात काही जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अंबरनाथ एमआयडीसी रोडवर एका भरधाव झायलोने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी देखील झाले आहेत. मृत आणि जखमी अशा सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले आहे. शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातील लोक गणेश विसर्जनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत दुजोरा नाही. सर्वजण उल्हासनगरचे असल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे.

Web Title: 3 died on the spot in car auto collision in ambarnath