शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

टीएमटीला हवेत २९१ कोटी, तिकीट दर प्रस्तावित; ठामपा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 23:45 IST

परिवहन प्रशासनाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी अनुदान मागितले असले, तरी महापालिका प्रशासन आता आपल्या मूळ अंदाजपत्रकात किती अनुदान प्रस्तावित करते याकडे लक्ष लागले आहे

ठाणे : गेल्या वर्षी ३५० कोटींचे अनुदान मागूनही परिवहन सेवेला केवळ ठाणे महापालिकने १३० कोटीच दिले होते, त्यामुळे यंदा त्यात वाढ न करता ते कमी करून २९१ कोटी रुपये मागितले आहेत. विशेष म्हणजे, परिवहन समितीनेही यात वाढ केलेली नाही. त्यामुळे बुधवारी सादर होणाऱ्या महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेला किती अनुदान मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिवहनच्या तिकीटदरात वाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असले, तरी गेल्या महिन्यात सादर केलेल्या परिवहनच्या अर्थसंकल्पात मात्र दरवाढ न सुचवता २०२०-२१ चा ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेकडून ३५० कोटी अनुदानाची मागणी करणाºया परिवहन प्रशासनाने यंदा ६० कोटी कमी करून केवळ २९१ कोटींचे अनुदान मागितले आहे. बसवर होणारा खर्च कमी केल्याने अनुदानाची रक्कम कमी करणे शक्य झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यानुसार परिवहन समितीनेही या अनुदानात वाढ केलेली नाही.तिकीटदर वाढ प्रस्तावितदोन वर्षांपासून तिकीटदरात वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून तांत्रिक कारणांमुळे ही दरवाढ करणे शक्य झालेले नाही. त्यानुसार अर्थसंकल्पातही तिचा उल्लेख नव्हता; परंतु पालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात परिवहन सेवेच्या तिकीटदरवाढीचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या टप्प्यातील तिकीटदरात किमान दोन रुपयांची वाढ सुचविली आहे.यंदा १० ते २० कोटी जास्तपरिवहन प्रशासनाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी अनुदान मागितले असले, तरी महापालिका प्रशासन आता आपल्या मूळ अंदाजपत्रकात किती अनुदान प्रस्तावित करते याकडे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात १० ते २० कोटींचीच वाढ नमूद असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिवहनच्या तोंडाला पुन्हा पाने फुसली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :tmcठाणे महापालिका