शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४८ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी २८ जण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:33 IST

चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू; सिव्हीलसह सहा पालिकांत १० वॉर्ड

ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून आतापर्यंत आढळलेल्या १४८ पैकी २८ जण अद्यापही उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. तर, एका महिलेसह पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते २२ एप्रिलदरम्यान स्वाइन फ्लू या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचा आकडा १४८ वर पोहोचला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाप्रमाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या रुग्णालयातही स्वाइन फ्लूच्या विशेष वॉर्डची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण १० वॉर्ड कार्यान्वित आहेत. तेथे १ जानेवारी ते २२ एप्रिलदरम्यान ३९ हजार १०४ जणांमध्ये फ्लूची संशयास्पद लक्षणे दिसल्याने त्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये १५५ संशयित रुग्ण पुढे आले आहेत. त्यापैकी १४८ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे महापालिकेच्या हद्दीत ७८ कल्याण-२४ आणि नवी मुंबई १६ तसेच मीरा-भार्इंदर येथे २८ तर जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच उल्हासनगर तसेच भिवंडीत अद्याप एकही रुग्ण समावेश नसल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयात एक जण उपचारार्थ दाखल आहे. तसेच ठामपाच्या हद्दीत ६, कल्याण-१५, नवी मुंबई-२ आणि मीरा-भार्इंदर येथे चार रुग्णांवर उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कालावधीत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेले १४८ पैकी ११४ जण आतापर्यंत उपचार घेऊन घरी परतले आहे. त्यामध्ये ठामपा हद्दीतील ७१, कल्याण-६, नवी मुंबई-१३, तर मीरा-भार्इंदर येथील २४ रुग्णांचा समावेश आहे.तपासणी करण्यात नवी मुंबईकर आघाडीवरजिल्ह्यात १२७ स्क्रिनिंग सेंटर असून संशयास्पद फ्लूची लक्षणे असल्याचे समोर आल्यावर जवळपास ३९ हजार १०४ जणांची तपासणी केली. त्यापैकी २८ हजार ३७९ नवी मुंबईकरांनी तपासणी करून आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात तीन हजार ८९०, त्यातच एकही रुग्ण न आढळलेल्या उल्हासनगर येथे तीन हजार ३२४, ठामपा-१ हजार ८३१, मीरा-भार्इंदर एक हजार १६७, भिवंडीत २९७ आणि केडीएमसी येथे १९५ जणांनी तपासणी केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू