शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार तळीरामांची उतरली झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:46 IST

मागील तीन वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे २७ हजार तळीरामांची झिंग उतरवली आहे. तसेच या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल दोन हजार ४०० तळीरामांना पकडून त्यांच्याकडून जवळपास १४ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- पंकज रोडेकरठाणे - मागील तीन वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे २७ हजार तळीरामांची झिंग उतरवली आहे. तसेच या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल दोन हजार ४०० तळीरामांना पकडून त्यांच्याकडून जवळपास १४ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर, ठाणे वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर आणि होळी-धूळवड या दिवसांत राबवलेल्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ या विशेष मोहिमेत दोन हजार मद्यपींवर कारवाई केली. गतवर्षात मद्यप्राशन करून वाहन चालवणाºया सर्वाधिक एक हजार ४९ तळीरामांना उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी पकडल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशी पाच परिमंडळे आहेत. यामध्ये वाहतूक शाखेच्या १८ उपशाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून त्याद्वारे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यावर कारवाई केली जात आहे. यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणाºया वाहनचालकावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या नियमानुसार कारवाई दरवर्षीच केली जाते.त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत २६ हजार ६८० तळीरामांची झिंग उतरवली आहे. यामध्ये २०१५ या वर्षात ४४१८ जणांना पकडले, तर २०१६ मध्ये ही कारवाई तीव्र केल्याने त्या वर्षभरात कारवाईचा आकडा तिपटीने वाढला. त्यावेळी हा आकडा १२ हजार २४८ वर गेला होता. मात्र, २०१७ ला हा आकडा १० हजार १४ आल्याची माहिती सूत्रांनी दिली.उपशाखेनुसार दाखल झालेल्या केसगतवर्षातील कारवाईचा वाहतूक पोलिसांच्या उपशाखांचा विचार केल्यास सर्वाधिक १०४९ केसेस उल्हासनगरात दाखल झाल्या आहेत. त्यापाठोपाठ कल्याणात ९५२ केसेस नोंदवल्या आहेत. सर्वात कमी केसेस राबोडीत १४० दाखल आहेत.मुंब्य्रात ७२२, भिवंडी ५६९, कोनगाव ४१२, विठ्ठलवाडी ४३७, अंबरनाथ-बदलापूर ५०२, कासारवडवली ७६४, ठाणेनगर ३७८, कोपरी २४३, नौपाडा ७६२, वागळे इस्टेट ७३२, कापूरबावडी ४१७, कळवा ४८७, नारपोली ३७४, कोळसेवाडी ५२४ आणि डोंबिवली ५५० असे तळीराम पकडले आहेत.दोन महिन्यांत२४०० केसया वर्षातील पहिल्याच महिन्यात १,४२५ मद्यपींना वाहन चालवताना पकडून त्यांच्याकडून नऊ लाख २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. फेब्रुवारीत ९६७ तळीरामांवर केसेस दाखल करून चार लाख ६५ हजारांचा दंड आकारल्याची माहिती पोलिसांनी दिली.३१ डिसेंबरप्रमाणे यंदा होळी-धुळवडीला वाहतूक शाखेद्वारे विशेष मोहीम हाती घेतली होती. ३१ डिसेंबरला १,३२७ तर होळी-धुळवडीला ६५६ मद्यप्राशन करून वाहन चालवणाºया चालकांविरोधात कारवाई केली आहे. या दोन्ही कारवाईचा आकडा इतर पोलीस दलांपेक्षा अधिक आहे. तर, सणाचे पावित्र्य राखण्यासाठी या दिवसांत विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे.- प्रशांत सतेरे, पोलीस निरीक्षक, प्रशासन विभाग

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस