जि.प.चे २७ कर्मचारी झाले प्रशासन अधिकारी/वरिष्ठ सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:38 IST2021-03-28T04:38:25+5:302021-03-28T04:38:25+5:30

ठाणे : जिल्हा परिषदेने सामान्य प्रशासन विभागातील २७ कर्मचा-यांना सहायक प्रशासन अधिकारीपदासह कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि वरिष्ठ सहायकपदी पदोन्नती ...

27 employees of ZP became administrative officer / senior assistant | जि.प.चे २७ कर्मचारी झाले प्रशासन अधिकारी/वरिष्ठ सहायक

जि.प.चे २७ कर्मचारी झाले प्रशासन अधिकारी/वरिष्ठ सहायक

ठाणे : जिल्हा परिषदेने सामान्य प्रशासन विभागातील २७ कर्मचा-यांना सहायक प्रशासन अधिकारीपदासह कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि वरिष्ठ सहायकपदी पदोन्नती देऊन होळीचा गोडवा वाढवला आहे.

सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जिल्हा परिषदेने या कर्मचा-यांची समुपदेशनाने रिक्त जागी पदोन्नती दिली आहे. यास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पदोन्नतीचे आदेशही शुक्रवारी सायंकाळी जारी केले. या पदोन्नती प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण सभागृहात कोरोनाच्या नियमांचे पालन करून समुपदेशन पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये सहायक प्रशासन अधिकारी म्हणून तीन जणांचा समावेश आहे. तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून १३ जणांना आणि वरिष्ठ सहायकपदी ११ कर्मचारी अशा २७ जणांना पदोन्नती दिल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी दिली.

Web Title: 27 employees of ZP became administrative officer / senior assistant