२६८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:12 IST2018-06-23T05:12:40+5:302018-06-23T05:12:43+5:30

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट होणार आहे.

268 colleges will be audited | २६८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

२६८ महाविद्यालयांचे होणार आॅडिट

ठाणे : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालये आणि संस्थांचे त्रयस्थ शैक्षणिक आॅडिट होणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील २१४ आणि पालघर जिल्ह्यातील ५४ महाविद्यालयांचा समावेश आहे, या आॅडिटसाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन केली असून, त्यामध्ये सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि गृहविभागाच्या सचिवांचा समावेश आहे.

Web Title: 268 colleges will be audited