भिवंडीतील टेकडीवरील २६ कुटुंबाना सुरक्षित हलविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:47 IST2018-07-09T16:47:16+5:302018-07-09T16:47:28+5:30
भिवंडी येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नारपोली पोलीस ठाण्यामागे अजमेरनगर येथे टेकडीचा काही भाग कोसळत असल्याने खबरदारीचा भाग म्हणून टेकडीवरील झोपड्यांत राहणाऱ्या २६ कुटुंबांना पालिका, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे स्थलांतरित केले, अशी माहिती भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली.

भिवंडीतील टेकडीवरील २६ कुटुंबाना सुरक्षित हलविले
ठाणे : भिवंडी येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नारपोली पोलीस ठाण्यामागे अजमेरनगर येथे टेकडीचा काही भाग कोसळत असल्याने खबरदारीचा भाग म्हणून टेकडीवरील झोपड्यांत राहणाऱ्या २६ कुटुंबांना पालिका, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे स्थलांतरित केले, अशी माहिती भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली. भिवंडी प्रांताधिकारी मोहन नळदकर हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात आला आहे. भिवंडीत गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे १२५ मिमी पाऊस झाला असून आज सकाळपासूनही पाउस सुरू आहे.