अपघाताच्या नावाखाली मदत मागून नवी मुंबईच्या रहिवाशाची २५ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 18:37 IST2018-01-07T18:32:55+5:302018-01-07T18:37:23+5:30
कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे भावनिक कारण पुढे करून जोधपुरच्या एका रहिवाशाने नवी मुंबईतील रहिवाशाकडून २५ लाख रुपयांची मदत मागितली. गावाकडचा माणूस म्हणून मदत केल्यानंतर आरोपींनी हात वर केले.

अपघाताच्या नावाखाली मदत मागून नवी मुंबईच्या रहिवाशाची २५ लाखांनी फसवणूक
ठाणे : कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे खोटे कारण सांगून नवी मुंबईच्या रहिवाशाची मदतीच्या नावाखाली २५ लाख रुपयांची फसवणूक करणाºया जोधपुरच्या दोन रहिवाशांविरूद्ध कासारवडवली पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी किरणसिंह शिवनाथसिंह राजपुरोहीत (४५) हे मुळचे जोधपूर येथील आहेत. आॅगस्ट २0१७ मध्ये त्यांना गावाकडील रेवतसिंह राजपुरोहित यांचा फोन आला. कुटुंबातील तिघांचा गंभीर अपघात झाला असून, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी असल्याचे त्याने किरणसिंह राजपुरोहीत यांना सांगितले. उपचारासाठी २५ लाख रुपयांची तातडीने मदत करण्याची विनंती त्याने केली. गावातील व्यक्ति म्हणून किरणसिंह राजपुरोहीत यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ठरल्याप्रमाणे रेवतसिंह राजपुरोहितने पैसे घेण्यासाठी चंद्रविरसिंह चौधरी याला पाठवले. २0 आॅगस्ट रोजी किरणसिंह राजपुरोहीत यांनी चंद्रविरसिंह चौधरी याला भार्इंदरपाड्यातील मेट्रो सुपर मार्केटजवळ बोलावून १0 लाख रुपये रोख दिले. याशिवाय १ सप्टेंबर २0१७ रोजीचा १५ लाख रुपयांचा धनादेश दिला. काही महिने निघून गेल्यानंतर किरणसिंह राजपुरोहीत यांना अशा प्रकारचा कोणता अपघातच झाला नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजपुरोहीत यांनी पैशासाठी तगादा लावला. रेवतसिंह राजपुरोहित याने पैशासाठी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. किरणसिंह राजपुरोहित यांनी शनिवारी याप्रकरणी कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार रेवतसिंह राजपुत आणि चंद्रविरसिंह चौधरी यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचे मोबाईल फोन सातत्याने बंद येत आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले.