शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

ठाणे कारागृहातील 25 कैदी झाले कोराेनाने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:56 PM

एकाच दिवसात पाच जणांना लागण : आतापर्यंत ५८ बाधित

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पाच कैद्यांना मंगळवारी कोरोनाची बाधा झाली असून, गेल्या एक आठवड्यामध्ये २५ जण बाधित झाले आहेत. गेल्या वर्षभरात ५८ कैदी बाधित झाले. आतापर्यंत ३३ न्याय बंदी कोरोनामुक्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी तसेच कारागृह पोलिसांनाही बसला आहे. मंगळवारी (२० एप्रिल) रोजी एकाच दिवसात पाच कैदी बाधित झाले. त्यांना ठाणे महापालिकेच्या भाईंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रात ठेवले आहे. सध्या २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व बंदी २५ ते ४० वयोगटातील आहेत. न्यायालयात सुनावणीसाठी येणे जाणे, मुंबईतील जे. जे. रुग्णालयात किंवा ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी या कैद्यांना नेले जाते. त्याचवेळी त्यांना हे संक्रमण झाल्याची शक्यता कारागृह प्रशासनाने व्यक्त केली आहे. कारागृहात सध्या तीन हजार ८५१ इतके बंदी आहेत. यामध्ये शिक्षा झालेले १२२ तर न्यायाधीन तीन हजार ७३० बंदी आहेत. या सर्वांची कारागृहातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नियमित तपासणी केली जाते. त्याच्याबरोबरच कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांचे थर्मल चेकअप तसेच दररोज दोन वेळा ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासली जाते. ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळली त्यांना वेगळे ठेवले जाते. याशिवाय, रोज ५० कैद्यांची आरोग्य तपासणी केली जाते, अशी माहिती कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली.

५८ कर्मचारी कोरोनामुक्तठाणे मध्यवर्ती कारागृहातील ६० कर्मचारी आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झाले. त्यातील ५८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून, दोघांवर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या २५ कैद्यांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर दोन कर्मचारीही सध्या बाधित आहेत. आतापर्यंत ३३ कैदी आणि ५८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. कारागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे रोज थर्मल चेकअप आणि ऑक्सिजन पातळीही तपासली जाते.हर्षद अहिरराव, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या