शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

टीएमटीच्या २२३ बसचे आयुर्मान संपले; नव्या २०० बस घ्या, परिवहन सभापतींचे महापौरांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 00:16 IST

सध्या असलेल्या बस दुरुस्तीसाठीदेखील परिवहनकडे निधी नाही. यापूर्वीदेखील नव्याकोऱ्या बससुद्धा किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीसाठी धूळखात पडून असल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे.

ठाणे : टीएमटीच्या बस रस्त्यावर धावण्यापेक्षा दुरुस्तीसाठीच अधिक काळ धूळखात पडल्याने तब्बल २२३ बसचे १० वर्षांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती न करता भंगारात काढून त्याऐवजी नव्या २०० बस घेण्याची मागणी ठाणे परिवहन समितीने महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे गुरुवारी केली.

परिवहनच्या ताफ्यात ५१७ बस असल्याचा दावा परिवहन सभापती विलास जोशी यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात केला आहे. मार्च २०२० पूर्वी ठाणेकरांच्या सेवेत २९० बस रस्त्यावर धावत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे आणि प्रवाशांची संख्या घटल्याने सध्या २१० बस रस्त्यावर धावत आहेत. त्यातही खाजगी ठेकेदाराच्या बसचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. यापूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत घेतलेल्या २२३ बसचे आयुर्मान आता १० वर्षांचे झाले आहे. त्यामुळे त्या दुरुस्त करण्याऐवजी थेट भंगारात काढाव्यात, असे महापाैरांनी म्हटले आहे. त्यातही केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वाहने बीएसव्ही-आय मानांंकनाची खरेदी करणे बंधनकारक आहे. या बसचे सुटे भागही डीलरकडे मिळत नसल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. यामुळे दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा नव्या २०० बस घ्याव्यात. सध्या एमएमआरडीएकडे परिवहनने १०० इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. त्यात आणखी १०० बस घेऊन २०० बस ठाणेकरांना उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांचे मत आहे.

दुरुस्तीचा खर्च कसा करणार?सध्या असलेल्या बस दुरुस्तीसाठीदेखील परिवहनकडे निधी नाही. यापूर्वीदेखील नव्याकोऱ्या बससुद्धा किरकोळ किंवा मोठ्या दुरुस्तीसाठी धूळखात पडून असल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. असे असताना आता २०० बस मिळाव्यात, यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु, त्या घेण्याचा खर्च कोण करणार, एमएमआरडीएने त्या घेऊन दिल्या, तरी त्याचा परतावा परिवहन कसा करणार. त्यातही त्या सेवेत आल्यानंतर बिघडल्या तर त्यांची दुरुस्ती कोण करणार, त्यासाठी परिवहनकडे निधी आहे का, असे अनेक सवाल आता यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMayorमहापौर