शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:52 IST

अपघातावेळी भरधाव कार चालवण्याची स्पर्धा  सुरू होती. त्यात कारचालकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील नितीन कंपनीजवळ रविवारी उत्तररात्री १:५० वाजता हिट अँड रनच्या घटनेत एका आलिशान कारने दुचाकीचालक दर्शन हेगडे (२१) याला चिरडले. या घटनेत दर्शन याचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर चालक पसार झाला आहे. अपघातावेळी भरधाव कार चालवण्याची स्पर्धा  सुरू होती. त्यात कारचालकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.

संत ज्ञानेश्वरनगरमधील साईकृपा सदन चाळीत दर्शन वास्तव्याला होता. ताे रविवारी उत्तररात्री १:३० वाजता दुचाकीवरून जेवण आणण्यासाठी वागळे इस्टेट येथे गेला होता. तेथून  घरी परतत असताना नितीन जंक्शन येथे  नाशिक हायवेने मुंबईकडे जाणाऱ्या आलिशान कारने भरधाव वेगाने दर्शन याच्या मोटारसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की,  दर्शन याचा घटनास्थळीच  मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.  या प्रकरणी दिशित ठक्कर यांनी  नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे कारचालकाचा  शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही

जोपर्यंत कारचालकाला  अटक केली जात नाही,  तोपर्यंत दर्शन याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्याच्या  नातेवाइकांनी घेतला आहे. घटना घडली तेव्हा कारची  स्पर्धा  लागली होती आणि कार चालवणाऱ्यांनी मद्यप्राशन केले होते, असाही आराेप हाेत आहे. नंबरप्लेट जागेवर मिळालेली असतानाही संबंधित कारचालकाला  अटक केली जात नसल्याने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय हेगडे कुटुंबीयांनी घेतला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूthaneठाणे